श्रीराम पूजन करताना गर्दी जमविल्या प्रकरणी मनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांना दुपारी १२ च्या सुमारास पोलिसांनी अटक केली. टीव्ही सेंटर येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्रीराम पूजनाचा कार्यक्रम मनसेतर्फे आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. तरीही जिल्हाप्रमुख दाशरथे यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने धाव घेत दाशरथे यांच्यासह शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, चंदू नवपुते यांच्यासह चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.